जळगाव, दि. ०२ – इ. १० वी, १२ वी नंतर काय करावे याकरीता जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता एक दिवसीय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन दि.१० जुन २०२३ शनिवार रोजी दुपारी ३ वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे करण्यात आले आहे.
जळगाव येथील इमदाद फाउंडेशन या शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या ‘एज्युकेशन फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत प्रथमच असे शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन मुंबई येथील प्रसिद्ध शैक्षणिक मार्गदर्शक मोहम्मद अमीर अन्सारी जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
ई. १० वी, १२ वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन इमदाद फाउंडेशन चे मार्गदर्शक शकील देशपांडे, असलम पटेल, अध्यक्ष- ऍड जमील देशपांडे, सचिव मो. आरीफ देशमुख, उपाध्यक्ष मतीन पटेल, आसिफ देशपांडे, अलफैज पटेल, तौसिफ देशपांडे, जुबेर देशपांडे, रमीज देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.








