• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या

तरुण कुढापा मंडळाचा पुढाकार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 31, 2023
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या

जळगाव, दि.३१ – देवपूजेचे निर्माल्य घंटागाडीत गेल्यामुळे त्याचे पवित्र भंगते. त्यासाठी स्वतंत्र वाहन हवे, ही पंडित प्रदीप मिश्रा यांची संकल्पना उराशी बाळगून तरुण कुढापा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र निर्माल्य संकलन वाहन सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी ३१ मे रोजी मान्यवरांच्या हस्ते भगवान महादेवाची महाआरती करून करण्यात आले.

घरोघरी पहाटे देवपूजा केली जाते. या देवपूजेतील निर्माल्य् मात्र कचरा समजून घंटागाडीमध्ये टाकले जाते. यावर पंडित प्रदीप मिश्रा यांनी स्वतंत्र निर्माल्य संकलन वाहन असायला हवे, अशी संकल्पना मांडली होती. हीच संकल्पना उराशी बाळगून तरुण कुढापा मंडळाने स्वप्न बाळगले. त्यानुसार निर्माल्य संकलन वाहन तयार केले. हे वाहन शहरात सगळीकडे जाणार आहे. एका प्रभागात आठवड्यातून एकदा हे वाहन येईल. त्यावेळी नागरिकांनी आपले देवपूजेचे निर्माल्य या वाहनात द्यायचे आहे.

या वाहनाचे उद्घाटन बुधवारी ३१ मे रोजी शहरातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तरुण कुढापा चौकाच्या पुढे असलेल्या उमाळेश्वर महादेव मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. यावेळी शहराचे आमदार राजूमामा भोळे, नगरसेवक विष्णू भंगाळे, नगरसेविका चेतना चौधरी, मंगला चौधरी, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना परदेशी, किशोर चौधरी, संजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाआरती झाल्यानंतर मान्यवरांनी निर्माल्य संकलन वाहनाला पुष्पहार घातला. त्यानंतर श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले. या अभिनव संकल्पनेबद्दल मान्यवरांनी मंडळाचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी तरुण कुढापा मंडळ आणि उमाळेश्वर महादेव मंदिर महिला मंडळाने परिश्रम घेतले.

Next Post
महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !

महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group