जळगाव, दि. १० – मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील सागर पार्क येथे महिलांसाठी पिंक आटो प्रशिक्षण सुरू असून मंगळवारी या ठिकाणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी स्वतः पिंक आटो मध्ये बसून रिक्षा स्वारीचा आनंद घेतला त्यांच्यासोबत आरटीओ इन्स्पेक्टर चव्हाण देखील उपस्थित होते.
दरम्यान जळगाव मधील महिला अतिशय उत्तम आणि धाडसी काम करत आहेत. याचेही त्यांनी कौतुक केले व महिलांना मार्गदर्शन करत मराठी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. मराठी प्रतिष्ठांच्या पिंक आटो उपक्रमाची सर्व माहिती अॅड निकम यांनी जाणून घेतली.
याप्रसंगी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, निलोफर देशपांडे, कांचन वाणी उपस्थित होते. दरम्यान मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पिंक आटो प्रशिक्षणाची ही तिसरी बॅच असून आता दहा महिला प्रशिक्षण घेत आहेत. या पूर्वीच्या पंधरा महिला यशस्वीरीत्या पिंक ऑटो चालवत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे यांनी दिली.