जळगाव, दि.०६ – भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जळगाव शहरात शुक्रवारी ठिकठिकाणी धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले. दरम्यान रॅलीत महिला, पुरुष ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांचा देखील समावेश होता.
अजिंठा हाऊसिंग सोसायटी तसेच सुप्रीम कॉलनीत देखील धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी रॅलीत सहभागी होऊन भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस अभिवादन केले. तसेच समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजेश झाल्टे, नगरसेवक गणेश सोनवणे, राधे भय्या, विठ्ठल पाटील बाळासाहेब ननवरे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.