• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाउंडेशन व जी.एच.रायसोनी महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 25, 2023
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक, सामाजिक
0
गांधी रिसर्च फाउंडेशन व जी.एच.रायसोनी महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम

जळगाव, दि.२५ – शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मोहिमेत सहभागी होत, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थी स्वयंसेवकांनी शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविली. शिरसोली रोड, कृष्णा लॉन, गणपती मंदिर जकात नाका परिसरात स्वच्छता करण्यात आली.

रस्त्याच्या शेजारी साचलेला प्लास्टिक, जैविक कचरा असा सुमारे ८ टन कचरा संकलित केला. त्यामुळे या परिसराचे रूप पालटले. चार तासांच्या या मोहिमेत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी होत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यस्थापन महाविद्यालयाने जळगाव शहरातील विविध अस्वच्छ भाग स्वच्छ करण्याचा कृतिशील उपक्रम राबवण्याचा निर्धार केला आहे.

रायसोनी महाविद्यालयापासून विद्यार्थ्यांनी ‘चला जळगाव शहर, स्वच्छ करूया’ ही जनजागृती फेरी काढली. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्याहस्ते या फेरीचा प्रारंभ झाला. या अनुषंगाने जळगाव शहर स्वच्छतेचे आवाहन करत ‘चला जळगाव शहर, स्वच्छ करूया’ असा संदेश जनजागृती फेरीतून देण्यात आला.

पुढील काळात स्वच्छतेचे महत्त्व जपत शिरसोली रोडसह जळगाव शहरातील विविध भागाच्या संवर्धनाची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. वसिम पटेल, प्रा. राहुल त्रिवेदी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे मदन लाठी, हेमंत बेलसरे उपस्थित होते. उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी कौतुक केले व भावी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

Next Post
आपत्ती व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांनी वाचवले रुग्णाचे प्राण

आपत्ती व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांनी वाचवले रुग्णाचे प्राण

ताज्या बातम्या

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू
जळगाव जिल्हा

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू

February 14, 2026
जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
जळगाव जिल्हा

जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

February 13, 2026
सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​
जळगाव जिल्हा

सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​

February 12, 2026
गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हे

गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

February 12, 2026
आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप
गुन्हे

आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप

February 12, 2026
अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण
कृषी

अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group