जळगाव, दि. २५ – रक्तदान हेच जीवनदान असे म्हटले जाते. तुम्ही दान केलेले रक्त कोणाचा तरी जीव वाचवू शकते. याचा प्रत्येय नुकताच जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आला.
बोदवड तालुक्यातील गरीब रुग्ण व जामनेर तालुक्यातील मालखेडा येथील महिला रुग्णाला रक्ताच्या अभावी उपचारास अडचण येत होती. सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाकडे उपचारासाठी देखील पैसे नव्हते. मंत्री गिरिष महाजन जनसंपर्क कार्यालयातून याची माहिती मिळाली. यासंदर्भात तात्काळ दखल घेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेत असलेले मयुर आनंदा जंजाळ व गणेश येऊल या विद्यार्थ्यांनी रक्तदान करत रुग्णाचे प्राण वाचले व उपचारासाठी देखील मदत केली.
यासंदर्भात जिल्हाधिकारी अमन मित्तल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गायकवाड , जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे रावल यांनी मयुर जंजाळ यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अत्यावश्यक वेळी सेवेसाठी तत्परतेने सेवा देण्याचा मानस मयूर जंजाळ याने व्यक्त केला.