• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेडक्रॉस मेडिकल व्हॅनचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते उदघाटन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 4, 2023
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
रेडक्रॉस मेडिकल व्हॅनचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते उदघाटन

जळगाव, दि.०४ – इंडियन रेडक्रॉस सोसायटी येथे कोरोना काळातील जळगावचे उल्लेखनीय कार्य लक्षात घेता कॅनडियन रेडक्रॉसच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय शाखा नवी दिल्ली व राज्य शाखा मुंबई यांच्या सहकार्याने अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा मेडिकल व्हॅनचा उदघाटन सोहळा रेडक्रॉसचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, रेडक्रॉसचे कोषाध्यक्ष शेखर सोनाळकर, आपत्ती व्यवस्थापन चेयरमन सुभाष सांखला, कार्यकारीणी सदस्य भालचंद्र पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.

रेडक्रॉस राष्ट्रीय शाखा नवी दिल्ली आणि राज्य शाखा मुंबई यांच्या मार्फत रेडक्रॉस जळगावला प्राप्त झालेले ३००० पल्स ऑक्सिमिटर, प्रथमोपचार प्रशिक्षणासाठी लागणारी मॅनिकिन, २० ऑटोमेटेड ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, रॅपटोकोस कंपनी मुंबई यांच्यामार्फत मिळालेले थ्रेप्टिन प्रोटीन बिस्कीट इत्यादी साहित्याची माहिती आणि मेडिकल व्हॅनच्या भविष्यातील उपक्रमाबाबत माहिती सांगत रेडक्रॉसचे चेअरमन विनोद बियाणी यांनी प्रास्ताविक केले.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, रेडक्रॉसच्या माध्यमातून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या तत्वानुसार मेडिकल व्हॅन द्वारे संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात व आदिवासी नागरिकांना रुग्णसेवा देण्यात येणार आहे. यात जनरल रुग्ण तपासणी, दंतरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, स्त्री रोग तपासणी, बाल रोग तपासणी आणि आवश्यकतेनुसार इतर तपासण्या हि करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जनरल प्रॅक्टिशनर असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. धनराज चौधरी, निमाचे अध्यक्ष डॉ. सतीश चौधरी, डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. लीना बोरोले, डॉ. राजेश सुरळकर यांना प्रातिनिधिक स्वरुपात पल्स ऑक्सिमिटर वितरण करण्यात आले. तसेच थॅलेसीमिया अमृत योजनेत योगदान देणाऱ्या देणगीदात्यांचा सन्मान हि करण्यात आला. तसेच निक्षय मित्र योजनेअंतर्गत टी.बी. ग्रस्त रुग्णांना पोषक आहार किट्सचे वाटप करण्यात आले. शाहू महाराज हॉस्पिटल मधील रुग्णांसाठी प्रातिनिधिक स्वरुपात मॅन्युअल व्हेटीलेटर देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला वर्मा यांनी केले व आभार डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी मानले.


Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात नैसर्गिक रंग बनविण्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

संत ज्ञानेश्वर विद्यालयात नैसर्गिक रंग बनविण्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

ताज्या बातम्या

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
खान्देश

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

August 30, 2025
जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
कृषी

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

August 30, 2025
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती

August 28, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा ‘इको क्लब’ ठरतोय पर्यावरणाचा श्री गणेश!
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा ‘इको क्लब’ ठरतोय पर्यावरणाचा श्री गणेश!

August 27, 2025
दुर्दैवी अपघात: ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाने चिमुकलीचा जीव घेतला
खान्देश

दुर्दैवी अपघात: ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाने चिमुकलीचा जीव घेतला

August 27, 2025
जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम : नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार निवारण सेवा
जळगाव जिल्हा

जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम : नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार निवारण सेवा

August 26, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group