• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्रवणदोष टाळण्यासाठी मोबाईल फोनचा वापर ठेवा मर्यादित.. – अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर

श्रवणदिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्णयंत्र वाटप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 3, 2023
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
श्रवणदोष टाळण्यासाठी मोबाईल फोनचा वापर ठेवा मर्यादित.. – अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर

जळगाव, दि.०३ –  श्रवणदोष असणाऱ्या रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चांगले उपचार मिळत आहेत. आर्थिक अडचण असणाऱ्या रुग्णांना आता महात्मा ज्योतिबा फुले योजनेचाही लाभ होत आहे. बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, मोबाइल फोनचा वाढता वापर यांमुळे कान, नाक आणि घसा यांच्या समस्या आपल्याला भेडसावत आहेत. त्यासाठी मोबाईल फोनचा वापर मर्यादित ठेवा, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागातर्फे शुक्रवार जागतिक श्रवण दिनानिमित्त विशेष उपक्रम घेण्यात आला. रुग्णालयातील महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमधून १० गरजू रुग्णांना श्रवणयंत्र मोफत वाटप करण्यात आले. त्यावेळी अधिष्ठाता डॉ. ठाकूर हे बोलत होते. प्रसंगी मंचावर उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत सुपे, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे अध्यक्ष डॉ. ज्योती बागुल, कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे उपस्थित होते.

अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर म्हणाले कि, रुग्णालयात कान, नाक, घसा रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळत असून ऑडिओमेट्री व बेरा सुविधाही उत्तम सुरु आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यात जाण्याचे त्रास वाचलेत. तसेच लहान-मोठ्या शस्त्रक्रियादेखील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याने गरीब, गरजू रुग्णांना दिलासा मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रसंगी डॉ. निशिकांत गडपायले, डॉ. विनोद पवार, डॉ. ललित राणे, डॉ. डॅनियल साजी, ऑडिओलॉजिस्ट मुनज्जा शेख आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन लिपिक चंद्रकांत ठाकूर यांनी तर आभार राजश्री वाघ यांनी मानले. गजानन भुशिंगे, राकेश सोनार, जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी, संदीप माळी, अभिषेक पाटील, तेजस वाघ, विकास ढाकणे आदींनी परिश्रम घेतले.


 

Next Post
रेडक्रॉस मेडिकल व्हॅनचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते उदघाटन

रेडक्रॉस मेडिकल व्हॅनचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते उदघाटन

ताज्या बातम्या

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल
गुन्हे

जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

October 9, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे महिलेला पडले महागात!

October 9, 2026
नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add