जळगाव, दि.१६ – रुग्णसेवेतूनच ईश्वरसेवा व्हावी या उदात्त हेतूने समता फाऊंडेशनतर्फे शुक्रवारी चार ऑक्सीजन क्रॉन्सन्ट्रेटर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयास भेट स्वरुपात देण्यात आले. त्याची क्षमता सात लिटर असून गरोदर माता, रुग्ण बालकांसह अन्य रुग्णांनाही ऑक्सीजन क्रॉन्सन्ट्रेटरचा लाभ होणार आहे.
गोदावरी फाऊंडेशन सदस्या डॉ.केतकी पाटील, डी. एम. कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांना समता फाऊंडेशनचे खान्देश टिम लिडर राजेंद्र दौंड, ईश्वर इंगळे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस. आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, रुग्णालयातील मार्केटिंग मॅनेजर रत्नशेखर जैन हे उपस्थीत होते.