जळगाव, दि.29 – राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे हॉकी जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्पोर्ट्स हाऊस जळगाव व हॉकी महाराष्ट्र तर्फे पुरस्कृत रविवारी स्पर्धा व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, पोलीस निरीक्षक विलास शेंडे, उप कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रफिक तडवी, हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख, सहसचिव प्राध्यापक डॉ. अनिता कोल्हे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, आयशा साजिद ,कांचन चौधरी व स्पोर्ट्स हाऊस चे अॅड. आमीर शेख उपस्थिती होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला महापौर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू शादाब सय्यद यांनी मेजर ध्यानचंद यांची माहिती विषद केली. जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व विषद केले. पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी क्रीडा व करिअर याबाबत मार्गदर्शन करून आपले उदाहरण स्पष्ट केले. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील यांनी सुद्धा आपल्या मनोगतात द्वारे खेळाडूंना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना महापौर जयश्री महाजन यांनी लवकरच महापौर चषक स्पर्धा तसेच महानगरपालिकेत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी मनपा व राज माध्यमिक विद्यालय प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
या राष्ट्रीय खेळाडूंचा झाला सत्कार
प्यारा ओलंपिक खेळाडू व तालुका क्रीडा अधिकारी मार्ग धर्माई,(बॅडमिंटन), आंतरराष्ट्रीय खेळाडू अयशा साजिद (कॅरम), कांचन चौधरी (जलतरण), राष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री पाटील ,सानिया तडवी व तहसीन तडवी (सर्वबुद्धिबळ), धनंजय धनगर व सुरज सपके (फुटबॉल), योगेश घोंगडे, सय्यद मोहसीन( कॅरम), शशांक अत्तरदे ,जगदीश झोपे, रिषभ कारवा, तनेश जैन, नचिकेत ठाकूर, निरज जोशी व आशुतोष मालुंजकर( सर्व क्रिकेट), सायली खंडागळे ,वर्षा सोनवणे, कोमल सोनवणे , नूतन शेवाळे,जुबेर कुरेशी , तौसिफ कुरेशी (सर्व हॉकी), लियाकत अली सय्यद, अरविंद खांडेकर व मुजफ्फर शेख ( हॉकीप्रशिक्षक) यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फारुक शेख यांनी तर आभार तालुका क्रीडा अधिकारी सौ सुजाता गुल्हाने यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी एम के पाटील, सुजाता गुल्हाने, अरविंद खांडेकर, मार्ग धर्मइ, गोविंद सोनवणे, विनोद कुलकर्णी, विनोद माने, सेंटर रेल्वेचे अकील शेख, भुसावळचे शोएब खान, मजाज खान, आमिर खान(मिली), जुबेर खान, इम्रान बिस्मिल्लाह, शारीक सैयद, मुख्तार पिंजारी आदींची उपस्थिती होती.