• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेहरुणमध्ये हरिनाम कीर्तन सप्ताह, भागवत कथेचे १५ नोव्हेंबरपासून आयोजन

नामांकित कीर्तनकारांचे विचार ऐकण्याची जळगावकर भाविकांना पर्वणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 13, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
मेहरुणमध्ये हरिनाम कीर्तन सप्ताह, भागवत कथेचे १५ नोव्हेंबरपासून आयोजन

जळगाव, दि. १३ – येथील मेहरुण भागामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा (संगीत) चे दि.१५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे २२ वे वर्षे आहे. जळगाववासियांनी या किर्तन सप्ताह तथा भागवत कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी केले आहे.

जीवनात सर्वत्र चैतन्य यावे, दु:खी कष्टी वाटणार्‍या मनाचा कीर्तन व प्रवचन श्रवणाने अध्यात्मिक विकास होऊन मनातील दुर्बलता नष्ट व्हावी यासाठी हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक तथा महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य, प्रभागातील नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांनी दिली आहे.

हरिनाम संकीर्तन सप्ताह उत्सवाचा प्रारंभ १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दररोज सकाळी ५ ते ६ या वेळेत काकड आरती, दुपारी १ ते ४ संगीतमय भागवत कथेचे आयोजन, संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी श्रीमद् भागवत ग्रंथ पुजन माजी महापौर नितीन लढढा आणि माजी नगरसेविका अलका लढढा यांच्या हस्ते होईल. सर्व कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर चौक कै. सुरेशमामा नाईक यांच्या घराजवळ मेहरुण भागामध्ये पार पडणार आहेत.

श्रीमद् भागवत कथा तुकाराम महाराज देवस्थान येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर हे सांगणार आहेत. ते शेवटच्या दिवशी २ डिसेंबर रोजी रात्री काल्याचे किर्तन देखील करणार आहे. दररोज आठ दिवस १५ रोजी जामनेर येथील एकनाथ महाराज, १६ रोजी कळमसरे येथील प्रल्हाद महाराज, १७ रोजी चिखली येथील दिनेश महाराज, १८ रोजी शेळगाव येथील दीपक महाराज, १९ रोजी जांभुळधाबा येथील ज्ञानदेव महाराज, २० रोजी को-हाळा येथील पंढरीनाथ महाराज, २१ डिसेंबर रोजी नाडगाव येथील जीवन महाराज हे रात्री ८ ते १० वाजे दरम्यान हरी कीर्तन करणार आहे.

सप्ताहाची सांगता २ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत श्रीमद् भागवत कथा पूजन मान्यवरांच्या हस्ते करून केली जाणार आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, उद्योजक अशोक जैन, राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे, आमदार राजूमामा भोळे, महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता श्रीमद् भागवत कथेची दिंडी मिरवणूक काढण्यात येणार असून मिरवणुकीनंतर भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सप्ताह यशस्वी होण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, श्रीराम तरुण मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जय जवान मित्र मंडळ, जय दुर्गा ग्रुप, साई दत्त ग्रुप, वंजारी युवा संघटना, श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी तसेच मेहरुणचे ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

 


Next Post
“गजल रेगिस्थान से हिंदुस्थान तक” या कार्यक्रमाने कला महोत्सवाला सुरुवात

"गजल रेगिस्थान से हिंदुस्थान तक" या कार्यक्रमाने कला महोत्सवाला सुरुवात

ताज्या बातम्या

जळगाव मनपा आरक्षण सोडतः ‘ड’ प्रभाग सर्वसाधारण, प्रस्थापितांना दिलासा!
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा आरक्षण सोडतः ‘ड’ प्रभाग सर्वसाधारण, प्रस्थापितांना दिलासा!

November 11, 2025
गोळीबार प्रकरण: पोलिसांना कुंटणखान्याची टीप दिल्याच्या संशयावरून गोळीबार!
खान्देश

गोळीबार प्रकरण: पोलिसांना कुंटणखान्याची टीप दिल्याच्या संशयावरून गोळीबार!

November 11, 2025
मेहरुणमध्ये ‘हरिनाम सप्ताह’ व ‘ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचा भक्तिमय प्रारंभ
जळगाव जिल्हा

मेहरुणमध्ये ‘हरिनाम सप्ताह’ व ‘ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचा भक्तिमय प्रारंभ

November 10, 2025
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिराचा समारोप
जळगाव जिल्हा

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिराचा समारोप

November 10, 2025
जळगावात गोळीबार: एकाचा मृत्यू, दोन जखमी; हद्दपार आरोपीकडून गोळीबार
खान्देश

जळगावात गोळीबार: एकाचा मृत्यू, दोन जखमी; हद्दपार आरोपीकडून गोळीबार

November 10, 2025
ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group