जळगाव, दि.२२ – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथील ओपीडी रविवारी दि.२३ ऑक्टोबर रोजी देखील सुरू असून रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या दीपावली सण सुरू आहे. दीपावली सणानिमित्त मात्र ओपीडी रविवार दि.२३ व मंगळवार दि.२५ रोजी देखील सुरू आहे. तर सोमवार दि.२४ रोजी लक्ष्मीपूजन आणि बुधवार दि.२६ रोजी भाऊबीज निमित्त ओपीडी बंद राहणार आहे.
नागरिकांनी दंत, नेत्र, कान-नाक-घसा, सर्दी-ताप, खोकला विविध जखमा, असह्य पोटदुखी, हाडांचे आजार, त्वचारोग, लहान मुलांचे आजार, स्त्रीरोग आदी तपासणी करण्यासाठी रविवारी आणि मंगळवारी रुग्णालयात यावे असे आवाहन रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.