जळगाव, दि.२३ – मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संगणक सुविधांचा लाभ घेऊन अधिक ज्ञानपूर्ण व्हावे असे प्रशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.
मेहरूण येथील नगरसेवक तथा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे सचिव मुकेश नाईक, मुख्याध्यापिका शीतल कोळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुरुवातीला प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना भेटवस्तू दिल्या. प्रशांत नाईक यांनी विद्यार्थ्यांना मिठाई वाटप केली. यावेळी नाईक यांनी मनोगतात सांगितले की, संगणकाचा वापर वाढला आहे. विद्यार्थी संगणक साक्षर व्हावे, त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडावी, विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षणासाठी पुढे यावे, या सुविधेचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.
यावेळी विद्यालयाला २० संगणकांचे वाटप करण्यात आले. प्रसंगी उज्वला नन्नवरे, साधना शिरसाठ, स्वाती नाईक, पूजा अस्कर, दिनेश पाटील, साक्षी जोगी, रूपाली आव्हाड, आम्रपाली शिरसाट, दिव्या पाटील, सोनाली जाधव, सोनाली चौधरी, पूनम निकम, नयना अडकमोल, जयश्री खैरनार, शिल्पा कोंगे, योगिता सोनवणे यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.