जामनेर, दि.२४ – आनंदयात्री परिवाराने जामनेर शहराचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करण्यासाठी वसा घेतल्याचे मत जे.के. चव्हाण यानी व्यक्त केले. याप्रसंगी जातं फिरवुन नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जे. के. चव्हाण, रजनी पाटील, प्रकाश पाटील, कचरू शेठ बोहरा, श्रीराम महाजन, नारायण बाविस्कर, श्रद्धा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थीत होते.
परिवर्तन संस्थेची निर्मिती असेलला तीन दिवसीय परिवर्तन आनंदयात्री महोत्सवास शुक्रवारपासून सुरवात करण्यात आली. बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याने मराठी माणसाला खान्देशाची वेगळी ओळख निर्माण करून दिली. साध्या सोप्या कविता आणि गाण्यांमधे जिवनाचं तत्वज्ञान लपलं असून त्या अलौकिक तत्वज्ञानाचं महत्व पटवून देणारा महाराष्ट्रभर गाजत असलेला परिवर्तन निर्मित अरे संसार संसार या कार्यक्रमाने महोत्सवास प्रारंभ करण्यात आला.
विजय जैन यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या व नारायण बाविस्कर यांनी दिग्दर्शीत केलेल्या ‘अरे संसार संसार’ कार्यक्रमाचे निवेदन शंभु पाटील यानी केले. गायिका मंजुषा भिडे , श्रद्धा पुराणिक, अक्षय गजभिये, हर्षदा कोल्हटकर यांनी गायन केले. विशाल कुलकर्णी, सोनाली पाटील, जयश्री पाटील, लीना लेले, यांनी कवितांचे वाचन केले. मनिष गुरव, योगेश पाटील, बुधभूषण मोरे यानी साथसंगत केली.
सूत्रसंचलन सुधीर साठे यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल सेठ, सुहास चौधरी, आशीष महाजन, गणेश राउत, चंद्रशेखर पाटील, नितीन पाटील, कडू माळी यांनी प्रयत्न केले. दरम्यान महोत्सवात आज शनिवारी ‘पालखी’ पंढरपुरच्या वारी वर आधारित सादरीकरण करण्यात येणार आहे.