पाचोरा, दि.१२ – तालुक्यातील नांद्रा येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान शनिवारी रात्रीच्या सुमारास कडू निंबाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने भर पावसात पेट घेतल्याचा प्रकार समोर आलायं.
नांद्रा येथील पाटचारी जवळ असलेल्या कडू लिंबाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने भर पावसात पेट घेतला. सुदैवाने अनर्थ टळला. कारण ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने त्याठिकाणी कुणीही नव्हते.
वटवाघूळचा निंब म्हणून या झाडाला लोक ओळखतात, शंभर वर्षांहून जुने हे झाड असून त्यावर वटवाघूळ पक्षांचे वास्तव होते. शेती शिवारातील मोकळ्या जागेत अथवा झाडावर वीज कोसळण्याचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा.