जळगाव, दि.०७ – स्व.सौ.कांताई यांच्या श्रध्दावंदन दिनानिमित्त आज भवरलालजी जैन यांच्या जन्मगावी वाकोद येथे राज्यस्तरीय श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा-२०२२ चे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा इयत्ता ५ वी ते ७ वी, ८ वी ते १० आणि ११ वी ते १२ वी या तिन गटात झाली.
इयत्ता ५ वी ते ७ वी या गटात प्रथम क्रमांकाने चाळीसगाव येथील डाॕ. काकासाहेब पुर्णपार्त्रे माध्यमिक विद्यालयाचा रणविर योगेश साळुंखे, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक शेंदुर्णी येथील आ.ग.र.ग.माध्यमिक विद्यालयाचा अर्थव तुषार पाटील, नागलवाडीचे माध्यमिक विद्यालयाची मुग्धा विजय याज्ञिक, ८ वी ते १० गटात जळगाव ए. टी. झांबरे विद्यालयाची सृष्टी विशाल कुळकर्णी प्रथम, चुंचाळे येथील नुतन माध्यमिक विद्यालयाचे रोशनी देविदास पाटील द्वितीय, पळसखेडे येथील नि.प. पाटील मा.विद्यालयाचा सुमित दिपक खैरे तृतिय.
११ वी ते १२ वी या गटात प्रथम चोपडाचे पंकज माध्यमिक विद्यालय वेदांत पांडुरंग चौधरी, द्वितीय वाकोदच्या राणीदान जैन माध्यमिक विद्यालय व शेंदुर्णीचे आ. रघुनाथराव गरूड महाविद्यालयचे प्रिती समाधान मोहिते व दिव्या संतोष चौधरी, तृतीय क्रमांक राष्ट्रीय कन्या शाळा ज्युनिअर काॕलेज रेणुका सिताराम सानप विजयी झाले.
दी.शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-आॕप सोसायटी लि.शेंदुर्णी संचलित राणिदानजी जैन माध्यमिक विद्यालय व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय वाकोद यांच्यातर्फे आयोजित व भवरलाल अॕण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार संपादक हेमंत अलोने, कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिष काशिद, जैन इरिगेशनचे मिडीया विभागाचे प्रमुख अनिल जोशी, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंग राजपूत, पोलीस पाटील संतोष देठे, पांडुरंग पाटील, यू. यू. पाटील, ए. टी. चौधरी, ए. ए. पटेल उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते ज्ञानयोगी आचार्य हे पुस्तक प्रकाशन झाले. स्वागतगिताने व दीपप्रज्वलन माल्यार्पण करून पारितोषिक वितरण सोहळाची सुरूवात झाली. एस. टी. चिंचोले यांनी प्रास्तविक केले. देवदत्त गोखले यांनी परिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले, मिळालेल्या माहितीचे संकलन करून विषयाला न्याय दिल्याचे सर्वच स्पर्धकांचे कौतूक केले.
परिक्षक म्हणून देवदत्त गोखाले, देवेंद्र पाटील, एस. व्ही. भोळे, प्रशांत देशमुख, भुषण पाटील, गणेश राऊत, अतुल पाटील, एम. बी. लोखंडे, सौ.ज्योती चौधरी यांनी काम पाहिले. सुत्रसंचालन एस. ए. पाटील यांनी केले. स्पर्धा प्रमुख नितीन पाटील यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी राणीदानजी जैन विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी व जैन फार्म यांनी सहकार्य केले.