जळगाव, दि.०४ – मुंबई येथे राजभवनात ०३ सप्टेंबर रोजी सिंघानिया शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सिंघानिया शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार अति महत्त्वाचा मानला जातो . या पुरस्काराचे वितरण शिक्षक दिनाचे औचित्य साधून करण्यात येत असते. या पुरस्कारासाठी अशाच सेवाभावी प्राचार्यांची निवड करण्यात येते.
दरम्यान आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये प्रत्येक महत्त्वाची जबाबदारी अतिशय यशस्वीरित्या अचूक पार पाडून आपले अस्तित्व सिद्ध करून दाखविले आहे. संपूर्ण भारतातून निवडक प्राचार्यांनाच या सन्मान सोहळ्यासाठी आमंत्रित केले जाते. यावर्षी के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांची निवड करण्यात आली. त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सुषमा कंची यांना राज्यपाल यांच्या हस्ते सिंघानिया उत्कृष्टता पुरस्कार मिळणे ही के.सी.ई. सोसायटीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे, असे गौरव उद्गार संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी करून प्राचार्य सुषमा कंची यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष डी.टी.पाटील आणि प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी देखील प्राचार्या सुषमा कंची यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच स्कूलच्या उपप्राचार्या माधवीलता सिट्रा आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.