गजानन पाटील | अमळनेर, दि.२५ – राजमाता जिजाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या ८० कोटी रुपयांच्या प्रकल्प अहवालाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची मान्यता मिळाली असून माजी आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराच्या वतीने फटाके फोडून केला आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
दरम्यान राजमाता जिजाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणी ला ८० कोटी रुपयांचा प्रकल्प अहवालास मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे आभार मानत माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या समर्थकांसह मित्र परिवार आघाडी, राजे संभाजी मित्र परिवार, शिवशक्ती चौक मित्र परिवार, पंकज चौधरी मित्र परिवाराचा वतीने जल्लोष करण्यात आला.
यावेळी शहरातील दगडी दरवाजा (राजे संभाजी चौक) येथे फटाक्यांची आतिषबाजी करत आंनदोस्तव साजरा केला.
व शासनाचे आभार मानले आहे.