संभाजीनगर, दि. ०६ – अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी अभियान यांच्या वतीने देण्यात येणारा समाजभूषण गौरव पुरस्कार येथील सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कार्य करनाऱ्या माणुसकी समुहाचे अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित व समाजसेवीका पुजा सुमित पंडित यांना देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मौलाना आझाद रीसर्च सेंटर येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, अधिष्ठाता काशिनाथ चौधरी हे होते.
या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र वृक्ष देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. समाजसेवक सुमित पंडित व पुजा पंडित त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून पंडित यांना महाराष्ट्रातुन विविध ८८ पुरस्कार मिळाले आहेत. तर सौ. पंडित यांना या आधी २२ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
समाजसेवक सुमित पंडित यांना समाजभूषण पुरस्कार व समाजसेवीका पुजा पंडित यांना महिला समाजरत्न गौरव पुरस्कार – २०२२ हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यामध्ये राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत पुरस्कार देण्यात आले. यावेळी अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी अभियानाचे संस्थेचे अध्यक्ष सय्यद साबेर, शफिक अहेमद, अब्दुल कय्युम, अनीस रामपुरे, प्रविन तांदडे, हसन शाह, पोलीस निरिक्षक अम्रपाली तायडे, जोती गीरी, प्रा.शरद सोनवणे, शेख मोबीन, लक्ष्मी पंडित, राम पंडित उपस्थित होते.