जळगाव, दि. २६ – मूळजी जेठा महाविद्यालयातील कान्ह ललित कला केंद्र स्वरदा संगीत विभाग आयोजित ‘तबला वादनातील बारकावे व तंत्र’ ही कार्यशाळा दि.२३ व २४ जुलै २०२२ रोजी घेण्यात आली. या कार्यशाळेला जळगाव जिल्ह्यासह बडोदा, मुंबई येथील विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पं.जयंत नाईक, (तलयोगी पं.सुरेशदादा तळवलकर याचे ज्येष्ठ शिष्य ) यांनी मार्गदर्शन केले.सोबत आदित्य कुलकर्णी आणि व्यंकटेश तांबे यांनी साथ केली.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पं. संजय पत्की संगीत विभाग प्रमुख (क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव), के. सी. ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी आणि कान्ह ललित केंद्राचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले. मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री.संजय भारंबे यावेळी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी मू.जे.महाविद्यालयातील संगीत विभाग प्रमुख प्रा.कपिल शिंगाणे, प्रा.देवेंद्र गुरव,आणि प्रा.मिलन भामरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ईशा वडोदकर यांनी केले व सर्वांचे आभार व्यक्त केले.