गजानन पाटील | अमळनेर, दि.०२ – तालुक्यातील तहसील कार्यालयात नुकतेच सुशोभित फलक बसविण्यात आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी तांदळी येथील विद्यार्थिनी दहावी पास झाल्यानंतर पहिल्यांदा तहसील कार्यालय आवारात आल्या असता. त्या ठिकाणी कोणतेही फलक नव्हते तरी या ठिकाणी विद्यार्थिनी तहसीलकार्यालयाची शोधा शोध करू लागल्या तहसील कार्यालय सापडल्यावर त्या ठिकाणी त्यांना कुठलेही फलक आढळून आले नव्हते.
विद्यार्थिनींनी तहसील कार्यालयावर नावाचा फलक असला पाहिजे अशी मागणी केली. दरम्यान माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या निदर्शनात हा सर्व प्रकार आल्यानंतर त्यांनी स्वखर्चाने लावला. तहसील कार्यावर नावाचा फलक राहुल यानंतर विद्यार्थिनींनी माजी आमदार कृषीभूषण रावसाहेब पाटील यांचे आभार मानले.