जळगाव, दि.०२ – राजस्थान येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रुमादेवी यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी कथा ऐकण्याची जळगावकरांना सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे रविवारी दि . ३ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता संभाजीराजे नाट्यगृहात या कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी अध्यक्षस्थानी माजी खासदार ईश्वरलाल जैन राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, नयनतारा बाफना, माजी महापौर प्रदीप रायसोनी, रमेश जैन, सुवर्ण उद्योजक अजय ललवाणी, मनीष जैन, सुशील बाफना, संजय लोढा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
रुमा देवी एक सामाजिक कार्यकर्त्या, बाडमेर, राजस्थान येथील भारतीय पारंपारिक हस्तकला कारागीर आहेत. रुमा देवी यांना भारतातील महिलांसाठी “नारी शक्ती पुरस्कार २०१८” हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला असून तीस हजारहून अधिक ग्रामीण महिलांच्या नेटवर्कशी निगडीत आहेत, तसेच त्या महिलांना प्रशिक्षित केले आहे आणि त्यांना उपजीविकेशी देखील जोडले आहे. तरी या प्रेरणादायी संवाद कार्यक्रमाला जळगावकरांनी मोठ्या संख्येत उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.