जळगाव, दि.०१ – हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायतराज, औद्योगिक क्रांती यासारखे अनेक घडामोडी अकरा वर्ष मुख्यमंत्री असताना वसंतराव नाईक यांनी कामगिरी केली आहे. अशा महापुरुष वसंतराव नाईक यांची जयंती एक जुलै रोजी जळगावात साजरी करण्यात आली.
दरम्यान प्रथम सुप्रीम कॉलनी येथील सेवालाल महाराज चौक या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर अनेक प्रकारचे वृक्ष या परिसरात लावण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर सिमा भोळे, गोर सिकवाडी नाशिक विभाग प्रमुख सुभाष जाधव, ललित कोळी, शैलेश पवार, रमेश चव्हाण, मनोज जाधव, गोर सेनेचे जिल्हा सचिव चेतन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सिताराम चव्हाण, सुनील चव्हाण, नितीन जाधव, अभिजित चव्हाण, अनिल राठोड, शाम राठोड, प्रशांत चव्हाण, बादल नाईक, ममराज पवार, शिंदी तांडा, अर्जुन राठोड, अभिषेक राठोड, आकाश राठोड, सुरेश राठोड, विशाल राठोड यांच्यासह गोर सेना जळगांव शहर यांच्यावतीने करण्यात आले होते.