जळगाव दि.३० – संभाजीनगर येथे दि. ३० जुन ते ०५ जुलै २०२२ यादरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर आंतर जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा संघ रवाना झाला. या संघाला जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष तेजेंद्र महेंद्रा, सचिव विनित जोशी, उपसचिव तनुज शर्मा, कोषाध्यक्ष अरविंद देशपांडे, सदस्य शेखर जाखेटे, यांनी शुभेच्छा दिल्या.
असा असेल संघ..
तेजम केशव (कर्णधार), शुभम चांदसरकर, करण पाटील, अर्श शेख, जाजिब शेख, राजश्री पाटील, साची गांधी, इशिका शर्मा, किशोर सिंग सिसोदिया (प्रशिक्षक व व्यवस्थापक)