• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 23, 2022
in जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

जळगाव, दि.२३ – जैन इरिगेशनच्या जैन हिल्स, जैन एनर्जी पार्क, जैन फूडपार्क, जैन प्लास्टिक पार्क बांभोरी, जैन टिश्युकल्चर पार्क टाकरखेडा त्याच प्रमाणे अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून त्या त्या लोकेशनवर योग मार्गदर्शकांनी कोरोनाचे नियम पाळत योग अभ्यास करून घेतला. योग दिनाचे महत्त्व समजून घेत नियमित योग करून निरामय आरोग्याचा संकल्प जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला.

जैन प्लास्टीक पार्क व टिश्युकल्चर पार्क..
ताडासन, तिर्यक ताडासन, कटीचक्रासन आणि दोन प्राणायम हे योग करून प्रत्येक व्यक्ती निरामय जीवन जगू शकतो असा आत्मविश्वास योगसाधक सुभाष जाखेटे यांनी व्यक्त केला. जैन प्लास्टिक पार्क व टाकरखेडा येथे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर बोरसे यांनी केले. प्लास्टिक पार्कचे सुमारे ६०० हून अधिक सहकारी, टिश्युकल्चर पार्क येथील महिला सहकाऱ्यांनी देखील यात हिरीरीने सहभाग घेतला होता.

जैन फूड पार्क येथे योगसाधना शिबिर..
जैन व्हॅली येथे जैन फूड पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन अॅग्री पार्क, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सुमारे १००० सहकाऱ्यांनी जैन व्हॅली येथील मसाला प्रक्रिया प्लांट जवळ योगसाधना केली. योग प्रशिक्षक सौ. ज्योती पटेल यांनी योग प्रशिक्षण दिले. ऑक्सीजनची पातळी वाढविण्यासाठी ताडासन करून घेतले. श्वसन शक्ती वाढविण्यासाठी चंद्र व सूर्य नासिका पित्त, मयूरासन, अर्धमयूरासन, प्राणायम, सुर्यनमस्कार केले. पचनशक्तीसाठी पार्श्वोस्तासन, हात व खांद्यासाठी कुक्कुटासन, शरीर लवचिक होण्यासाठी आंजनेयासन, कंबर व पाठीसाठी भुजंगासन शलभासन, तणाव कमी करण्यासाठी अर्धचक्रासन, त्रिकोणासन, गरूडासन करून घेतले. तत्पूर्वी त्यांनी योगदिनाचे शास्त्रीय व अध्यात्मिक महत्त्व ज्योती पटेल यांनी समजून सांगितले. जैन टिश्यूकल्चर पार्कच्या वरिष्ठ सहकारी सौ. अनिता यादव यांच्याहस्ते सूतीहार देऊन ज्योती पटेल यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कंपनीचे वरिष्ठ सहकारी डॉ. व्ही. आर. सुब्रम्हण्यम, डॉ. प्रमोद करोले, बालाजी हाके, अरविंद कडू, रोशन शहा, संजय पारख, असलम देशपांडे, उदय महाजन, नितीन चोपडा यांसह इतर सहकाऱ्यांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमासाठी मानव संसाधन व कार्मिक विभागाच्या जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, रवि कमोद, आर. डी. पाटील, भिकेश जोशी व इतर सहकारी यांचे सहकार्य लाभले तसेच ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले.

अनुभूती निवासी स्कूल व अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल..
अनुभूती इंटरनॅशन निवासी स्कूल येथे इयत्ता 5 वी ते 12 च्या संपूर्ण विद्यार्थ्यांसह शिक्षक शिक्षकतेर कर्मचाऱ्यांनी योगसाधना केली. योगशिक्षीका डॉ. स्नेहल पाटील यांनी विविध योगासने करून घेतली. योग एक जीवनशैली यावर मार्गदर्शनही डॉ. स्नेहल पाटील यांनी केले. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनानुसार योगदिन साजरा करण्यात आला. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देखील योग दिवस साजरा झाला.


 

Next Post
कजगावात जनरेटर चोरीचा प्रयत्न ; आरडाओरड केल्याने चोरटे पसार

कजगावात जनरेटर चोरीचा प्रयत्न ; आरडाओरड केल्याने चोरटे पसार

ताज्या बातम्या

‘बहिणाबाई महोत्सवा’त फॅशन शोच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकतेचे दर्शन
खान्देश

‘बहिणाबाई महोत्सवा’त फॅशन शोच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकतेचे दर्शन

January 25, 2026
तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल
खान्देश

तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल

January 24, 2026
माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या
गुन्हे

माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या

January 24, 2026
खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ
खान्देश

खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ

January 23, 2026
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण
जळगाव जिल्हा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण

January 23, 2026
गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड
खान्देश

गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड

January 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group