जळगाव, दि.०६ – जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने सुबोनियो पक्षीघर परिसरात डॉ. डी. जी. बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गौरी राणे, अँड मंगला ठोंबरे- निवृत्त जॉईंट सेक्रेटरी लॉ अँड ज्यूडीशरी विभाग,मंत्रालय-मुंबई, सुबोनियो केमिकल्सचे संचालक सूबोध चौधरी, सुमोल चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारची फळझाडे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
जांभूळ, बदाम, चिंच, उंबर, पेरू अशी पूर्ण देशी झाडं पक्षीघर परिसरात लावण्यात आली. झाडं मोठी झाल्यावर येणाऱ्या पक्षांना फळांचा आस्वाद घेता यावा, अशी संकल्पना राबविण्यात येत आहे.
दरम्यान मेहरून तलावाच्या काठावर जळगांव महानगरपालिका, सुबोनियो केमिकल्स व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मेहरूण तलाव परिसरात सत्तर फूट उंच पक्षी घर साकारण्यात आले आहे. वृक्षारोपण प्रसंगी हिरा सूबोध चौधरी, सारिका चौधरी, अपर्णा चौधरी, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, निलोफर देशपांडे, डॉ सविता नंदनवार यांच्यासह मतीन पटेल, संदीप मांडोळे, दिपक धांडे, किरण पांडे उपस्थित होते.