जळगांव, दि. १६ – शहरातील मेहरूण तलावाचे उगमस्थान असलेला ब्रिटिश कालीन अंबाझरा तलाव पाटचारी सफाई अभियान मराठी प्रतिष्ठान गेल्या तीन वर्षांपासून राबवत असून यामुळे मेहरूण तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होते.
दरम्यान महापालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना मराठी प्रतिष्ठान तर्फे अंबरझरा तलावाची चारी स्वच्छ करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दुसऱ्याच दिवशी स्वतः येऊन पाहणी केली. अंबाझरा तलावाचे निरीक्षण केले. सोबत असलेल्या मनपा अधिकारी यांना सूचना देऊन पाटचारी सफाई व दुरूस्ती बाबत पावसाळ्या पूवी कार्यवाही करा असे आदेश दिले.
तसेच तातडीने जेसीबी उपलब्ध करून देऊन सफाई अभियानाला सुरवात करून दिली. यावेळी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, निसर्ग प्रेमी, पालिकेचे अभियंता व्ही. ओ. सोनावणे, दीपक धांडे उपस्थीत होते. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या कार्यतत्पर ते मुळे यावर्षी देखील मेहरूण तलाव १०० टक्के भरेल असा विश्वास मराठी प्रतिष्ठानचे सचिव विजय वाणी यांनी व्यक्त केला.