• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्यस्तरीय ओबीजीवायएनकॉन परिषदेत पेपर सादरीकरणात डॉ.यशश्री देशमुख प्रथम

भित्‍तीपत्रक सादरीकरणात डॉ.आफिया खानचा तृतीय क्रमांक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 9, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
राज्यस्तरीय ओबीजीवायएनकॉन परिषदेत पेपर सादरीकरणात डॉ.यशश्री देशमुख प्रथम

जळगाव, दि.०९ – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात कार्यरत रेसिडेंट डॉ. यशश्री देशमुख यांनी राज्यस्तरीय ओबीजीवायएनकॉन परिषदेत पेपर सादर करुन प्रथम तर डॉ.आफिया खान यांनी भित्‍तीपत्रक सादरीकरणातून तृतीय क्रमांक पटकाविला.

द असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्ट्रेट्रिक्स अ‍ॅण्ड गायनॅकलॉजिकल सोसायटीज (रोसी) च्या मार्गदर्शनानुसार औरंगाबाद ओबीजीवाय सोसायटीतर्फे शनिवारी या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागींनी पेपर व पोस्टर्स सादरीकरणात सहभाग नोंदविला. यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ओबीजीवाय शाखेत एम.एस.द्वितीय वर्षाला असलेल्या डॉ. यशश्री देशमुख यांनी सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच एम.एस.प्रथम वर्षाला प्रवेशित डॉ. आफिया खान यांनी भित्‍तीपत्रक सादरीकरणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यात तृतीय क्रमांक डॉ.आफियाने प्राप्त केला.

या स्पर्धेत डॉ. यशश्री देशमुख यांनी गरोदरपणात स्त्रीयांच्या वाढणार्‍या बीपीबाबत सुरुवातीपासूनच कलर डॉपलरद्वारे कसे ओळखले जाऊ शकते, या विषयावर पेपर सादर केला. तर डॉ. आफिया खान यांनी स्त्रीयांना गरोदरपणात जर इन्फेक्शन झाले तर ते कसे ओळखले जाऊ शकते, याबाबत भित्‍तीपत्रक सादर केले.

त्याबद्दल औरंगाबाद जीएमसीचे फॅक्ल्टी असलेल्या तज्ञांच्याहस्ते बक्षीस देऊन गौरव केला. बक्षीसाचे स्वरुप रोख रक्‍कम व प्रमाणपत्र असे होते. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी डॉ.यशश्री व डॉ.आफिया यांचे कौतुक करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच डीन डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, ओबीजीवाय प्रमुख डॉ. माया आर्विकर आदिंनी कौतुक केले.

Next Post
‘खोटं बोला पण रेटून बोला’ हि मोदी सरकारची पॉलिसी.. – देवेंद्र मराठे

'खोटं बोला पण रेटून बोला' हि मोदी सरकारची पॉलिसी.. - देवेंद्र मराठे

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group