जळगाव, दि.०२ – शहर महानगरपालिका हद्दीमधील मिळकत धारकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १४० अ मधील तरतूदीनूसार संपूर्ण वर्षाचा मालमता कराचा आगाऊ भरणा दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यंत केल्यास १०% सुट देण्यात आली. मात्र मुदत संपल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे.
दरम्यान मिळकत धारकांचा वाढता प्रतिसाद पाहून जास्तीत जास्ती नागरीकांना लाभ घेता यावा म्हणून महापौर जयश्री महाजन यांनी दिलेल्या सूचनेनुसार जळगांव शहर महानगरपालिकेने सदरची सुट देण्यास दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तरी जळगांव शहर महानगरपालिका हद्दीतील जास्तीत जास्त नागरीकांनी संपूर्ण वर्षाचा मालमत्ता कराचा आगाऊ भरणा दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत करून, मालमत्ता करात १० टक्के सुट चा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.