जळगाव, दि.०९ – गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाद्वारे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत गुरुवारी रॅलीसह विद्यार्थ्यांना हेल्दी डाएट फूडचे महत्व पटवून देण्यासाठी उपक्रम घेण्यात आले. याप्रसंगी फास्टफूडचे दुष्परिणाम आणि सात्विक पदार्थांची विद्यार्थ्यांना माहिती दिली. निरोगी आणि सुदृढ आरोग्य असणारे अधिक कार्यक्षम असतात आणि दीर्घकाळ जगतात तसेच रोगमुक्त असतात.
नागरिकांचे आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. यंदाच्यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने ‘अवर प्लॅनेट अवर हेल्थ’ ही संकल्पना असून ग्रहाच्या आणि त्यावर राहणाऱ्या माणसांच्या आरोग्याकडे लक्ष वेधण्याचा हा उद्देश्य आहे. प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो हे सत्य नाकारता येत नसल्याने ’हवामान संकट हे आरोग्य संकट’ असल्याचा यातून संदेश देण्यात आला.
त्याअनुसार गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने दिवसभर आरोग्य दिन जनजागृतीबाबत उपक्रम राबविले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.मौसमी लेंढे यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर महाविद्यालय परिसरात रॅली काढून सात्विक आहार, स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. भर उन्हाळ्यात वृक्षांना देखील वाढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते ते ओळखून सर्वांनी वृक्षांना पाणी दिले.
फास्टफूडचे दृष्परिणाम विद्यार्थ्यांना दिले पटवून..
यानंतर डॉ.उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल येथे गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे बीएस्सी प्रथम वर्ष, जीएनएम द्वितीय वर्ष आणि फंटामेंटल ऑफ नर्सिंग विभागाद्वारे विद्यार्थ्यांना आरोग्य दिनाचे महत्व पटवून दिले. तसेच निरोगी आरोग्यासाठी फास्ट फूड किती घातक आहे, याचे पोस्टर्सद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील यापुढे आम्ही सात्विक आहारच घेऊ असे सांगितले. याप्रसंगी स्कूलच्या प्राचार्य अनघा पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील सर्वच स्टाफची उपस्थीती होती.