• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ऑफलाइन व ऑनलाईन परीक्षेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा.. – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची मागणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 6, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
ऑफलाइन व ऑनलाईन परीक्षेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा.. – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची मागणी

जळगाव, दि.०६ – ऊन्हाळी परिक्षेकरिता विद्यार्थ्यांना ऑफलाइन व ऑनलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेच्यावतीनं मंगळवारी जळगावात करण्यात आली. दरम्यान संघटनेच्या वतीने उच्च शिक्षण सहसंचालक डाॅ.संतोष चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र सहसचिव दिपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, जिल्हा सचिव रोहित काळे, अतुल उबाळे, सुकलाल सुरवाडे, संदिप बोरसे आदि उपस्थित होते.

दरम्यान, निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विद्यार्थ्याच्या हक्क आणि अधिकारांच्या पूर्ततेसाठी न्यायिक स्वरुपाचा लढा देण्याचं कार्य करीत आहे. यामुळै आपल्या अधिकार क्षेत्रात येणारी विद्यापीठ प्रशाळा तसेच विद्यापीठांंशी संलग्नीत सर्व महाविद्यालयाचे येणारी हिवाळी परीक्षा ही आँनलाइन आणि आँफलाइन या दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना देण्याची मागणी संघटनेच्यावतीने लावून धरण्यात आली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पाश्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लादलेल्या निर्बधामुळे महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशामुळे आँनलाइन पद्धतीने चालु होते आणि चालु आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे राज्यात २० आँक्टोबर पासुन आँफलाइन पद्धतीने महाविद्यालय सुरु केले ही मागणी आमचीच होती. या निर्णयाच आम्ही स्वागत सुद्धा केले होते, मात्र त्यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी असं म्हटलं होते की ज्या विद्यार्थ्याचे दोन डोस पुर्ण झालेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेश मिळणार ज्या विद्यार्थ्याचे लसीकरण झाले नाही अशा विद्यार्थ्यासाठी आँनलाइन पद्धतीने शिक्षण सुरु ठेवलेले आहे.

त्यामुळे आमची मागणी आहे की उन्हाळी सत्राच्या परीक्षा ह्या आँनलाइन व आँंफलाइन या दोन्ही पद्धतीने घेण्यात याव्यात. सध्याचे शैक्षणिक सत्र आपण आँनलाइन पद्धतीनेच सुरु केले होते. ०१ फेब्रुवारी ते ०५ एप्रिल पर्यत ५५% ते ६०% अभ्यासक्रम हे आँनलाइनच शिकवून पूर्ण झालेले आहे. सध्या महाराष्ट्रांत सुरु असलेल्या एस.टी. कामगारांचा संप, रेल्वेने प्रवास बंद जर दळणवळणाची मुख्य व्यवस्थाच बंद आहे. तर मग विद्यार्थी आँनलाइन शिकवून आँफलाइन परीक्षेसाठी कसे पोहचणार याचा विचार प्रशासनाने विद्यापीठ स्तरावर करावा.

आमचा आँफलाइन शिक्षणाला विरोध नाही मुळात आमची ही सुरवातीपासूनचीच मागणी राहीलेली आहे की शिक्षण ऑफलाईन सुरु करा म्हणूनच पुढील शैक्षणिक वर्षाचे सत्राच्या परीक्षा व तासिका आँफलाइन पद्धतीने घेण्यात यावे त्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक दृष्टया स्वत:ला तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल व त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती देऊ शकता. तरी आपण येणारी ऊन्हाळी परीक्षा विद्यार्थ्यांना आँनलाइन व आँफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध करुन द्यावेत. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठात आंदोलन करू असा इशारा संघटनेमार्फत निवेदनातुन देण्यात आला आहे.


 

Next Post
राष्ट्रीय बुध्दिबळ सांघिक अजिक्यपद स्पर्धा यंदा जळगावात VIDEO

राष्ट्रीय बुध्दिबळ सांघिक अजिक्यपद स्पर्धा यंदा जळगावात VIDEO

ताज्या बातम्या

मेहरुण येथील साईबाबा मंदिराचा १९ वा वर्धापन दिन; ‘दरबार मेरे साई का’ सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

मेहरुण येथील साईबाबा मंदिराचा १९ वा वर्धापन दिन; ‘दरबार मेरे साई का’ सोहळ्याचे आयोजन

January 22, 2026
जळगाव महापालिकेवर ‘ओबीसी’ महिला राज; आरक्षण सोडतीने इच्छुकांची गणिते बदलली!
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेवर ‘ओबीसी’ महिला राज; आरक्षण सोडतीने इच्छुकांची गणिते बदलली!

January 22, 2026
जळगाव मनपा भाजप गटनेतापदी प्रकाश बालाणी; नाशिकमध्ये गटनोंदणी पूर्ण
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा भाजप गटनेतापदी प्रकाश बालाणी; नाशिकमध्ये गटनोंदणी पूर्ण

January 21, 2026
जळगावात ‘बंधुतेचे तिळगूळ’ उपक्रमातून सामाजिक एकतेचा संदेश
जळगाव जिल्हा

जळगावात ‘बंधुतेचे तिळगूळ’ उपक्रमातून सामाजिक एकतेचा संदेश

January 21, 2026
राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा; जळगावात पटकावले विजेतेपद
क्रिडा

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा; जळगावात पटकावले विजेतेपद

January 20, 2026
जळगाव मनपा निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर संशय; सीसीटीव्ही फुटेजसह फेरमतमोजणीची माहिती देण्याची मागणी
Uncategorized

जळगाव मनपा निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर संशय; सीसीटीव्ही फुटेजसह फेरमतमोजणीची माहिती देण्याची मागणी

January 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group