जळगाव, दि.०१ – मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात वाचन संस्कृती टिकवण्यासाठी पुस्तकाची गुढी उभारण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरूणचे नगरसेवक प्रशांत नाईक व संचालिका अर्चना प्रशांत नाईक यांच्या हस्ते पुस्तकांच्या गुढीचे पुजन करण्यात आले.
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.नंतर पुस्तकाची गुढीचे पुजन करण्यात आले.
प्रसंगी मंचावर श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक, संचालीका अर्चना प्रशांत नाईक, मुख्याध्यापिका शितल कोळी उपस्थित होते. यानंतर शाळेतील पितृछत्र हरवलेल्या विद्यार्थ्याना वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणुन पुस्तके भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी तर आभार उज्वला नन्नवरे यांनी मानले. नियोजन संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी केले. यावेळी आम्रपाली शिरसाट, साधना शिरसाट, दिनेश पाटील, निशा मराठे, नैना अडकमोल आदींसह शिक्षक वृंद उपस्थित होते.