जळगाव, दि.०१ – केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप करत शुक्रवारी जळगावात जिल्हा युवक काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले.
सर्वसामान्यांना त्रस्त करणा-या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
त्यानुसार आज जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वात शहरातील काँग्रेस भवन येथे महंगाई मुक्त भारत आंदोलनाअंतर्गत पेट्रोल, डिझेल, गॅसच्या रोजच्या दरवाढीमुळे वाहनांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. तसेच वाहनांनवर अंत्यसंस्कार करून आगळ्या वेगळ्या पध्दतीने मोदी सरकारच्या निषेध केला.
भविष्यात अशाच प्रकारे इंधन दरवाढ राहिली तर सर्व सामन्यांना वाहन चालविणे कठीण होईल व ते वाहन असेच धूळ खात पडलेले राहतील व नागरिकांवर पायी फिरण्याची वेळ मोदी सरकारच्या कृपेमुळे येईल. असे म्हणत पेट्रोल, डिझेल दरवाढ न थांबल्यास पेट्रोल पंपावरील मोदींच्या बॅनरर्सला काळे फसण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिला.
यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगरध्यक्ष मुजीब पटेल, सरचिटणीस डॉ.शोएब पटेल, माजी प्रदेश सचिव बाबा देशमुख, मुरली सपकाळे, मकसूद पटेल, हर्षल दाणी , फैजन शहा, सारफराज शहा, दीपक कोळी, युसूफ खान, फज्जू शेख ,अनिल सोळंखी, झाकीर बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.