• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

४७ वर्षीय महिलेच्या उजव्या खुब्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

जॉईंट रिप्लेसमेंट सर्जनच्या अथक प्रयत्नांनी रुग्ण चालू लागली

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 15, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
४७ वर्षीय महिलेच्या उजव्या खुब्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव, दि. १५ – मागील ५ ते ६ वर्षांपासून संधीवाताच्या समस्येने त्रस्त असलेली महिला ५ महिन्यांपासून पलंगावर खिळून होती, अशा रुग्णाची हिस्ट्री जाणून घेत जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ.दिपक अग्रवाल हे समस्येच्या मुळाशी गेले आणि रुग्णाच्या उजव्या खुब्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिला आता चालायला लागल्याने कुटूबियांनी डॉक्टरांचे आभार मानले.

मुक्‍ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा येथील उषाबाई भास्कर हिरोळे (वय ४७) ह्या गेल्या पाच महिन्यांपासून पलंगावर खिळून होत्या. संधीवातामुळे त्यांना हात-पाय तसेच जॉईंट्समध्ये तीव्र वेदना होत होत्या. मात्र जेव्हा दुखणे वाढले त्यावेळपासून रुग्ण महिलेचे चालणेही बंद झाले. रूग्णाला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आल्यावर डॉ.दिपक अग्रवाल यांनी रुग्णाची तपासणी केली तसेच आवश्यक चाचण्याही करुन घेतल्यात. यातून रुग्णाचा खूबा जागेवरुन सरकला असल्याने महिलेला तीव्र वेदना होत होत्या. तात्काळ टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करावी लागणार असा सल्‍ला डॉक्टरांनी दिला.

नातेवाईकांच्या संमतीनंतर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ.दिपक अग्रवाल यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांना रेसिडेंट डॉ.सुनिल वेलणकर, डॉ.परिक्षीत पाटील, भुलतज्ञ डॉ.देवेंद्र चौधरी यांचे सहकार्य लाभले. अ‍ॅसिटाब्यूल प्रोट्रूसिओ अर्थात उजव्या खुब्याच्या शस्त्रक्रियेनंतर लगेचच डाव्या बाजूला एव्हीएल अर्थात
एव्हस्कुलर नेक्रोसिस करण्यात आले, यात कोअर डिकम्प्रेसर बसविण्यात आले, जेणेकरुन रक्‍तपुरवठा सुरळीत राहील. एकाच दिवशी ह्या दोन्ही शस्त्रक्रिया झाल्या, तीन आठवड्यानंतर रुग्ण आपल्या पायांवर चालायला लागली.

खुब्याच्या दुखण्यांवर उपचार..
हाडे, मणके असो वा खुब्याची दुखणे यावर तात्पुरता औषधोपचार घेऊन उपयोग होत नाही. अशा दुखण्यांसाठी स्पेशालिस्ट डॉक्टरकडून रुग्णांनी तपासणी करुन घ्यायला हवी. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया येथे उपलब्ध असतात, त्यामुळे आजच आपली जुनाट वा नविन दुखणी घेऊन रुग्णालयात यावे आणि निश्चिंत व्हावे, असे मी आवाहन करतो. – डॉ.दिपक अग्रवाल, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन

येथील उपचाराने आई चालायला लागली..
माझी आई शेतीकाम करायची मात्र संधीवाताचा त्रास सुरु झाला आणि ती आता घरीच असते, मात्र मागील पाच महिन्यात दुखणे इतके वेगाने वाढले की आता ती कधीच चालू शकणार नाही असे मला वाटले मात्र मलकापूर येथील डॉ.चोपडे यांनी आम्हाला येथे जा असे सांगितले आणि खरोखरच येथे झालेल्या शस्त्रक्रिया आणि डॉक्टरांच्या वेळोवेळी मार्गदर्शनसोबतच प्रोत्साहनाने आई चालायला लागली, त्याबद्दल मी रुग्णालयाचे आभार मानतो.
-विक्‍की हिरोळे, रुग्णाचा मुलगा


Tags: डाॅ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय
Next Post
रेशन दुकानदार संघटनेचा नाशिक विभागीय मेळावा संपन्न

रेशन दुकानदार संघटनेचा नाशिक विभागीय मेळावा संपन्न

ताज्या बातम्या

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल
गुन्हे

जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group