जळगाव, दि. ११ – अग्रोवर्ल्ड च्या माध्यमातून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन जळगावात करण्यात आले. शहरातील शिवतीर्थ मैदानावर आयोजित या कृषी प्रदर्शनाचे उदघाटन खासदार उन्मेष पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जैन इरिगेशनचे विपणन प्रमुख अभय जैन, श्रीराम ठिबकचे अध्यक्ष श्रीराम पाटील, प्लॅनटो कृषी तंत्रचे स्वप्नील चौधरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रदर्शनात ड्रोन फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक हे विशेष आकर्षण असणार असून, या ठिकाणी शेती तंत्रज्ञान विषयीची माहिती देणारे स्टॉल तसेच शेती अवजारे, यंत्रे, साधन सामुग्री आदींचे प्रात्यक्षिक व विक्री करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकाच छताखाली विविध कंपन्यांचे उत्पादने पायला मिळणार असल्याची माहिती अग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी ऍग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शन ही एक चांगली पर्वणी असल्याचे मत खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केलं. तसेच शेती संबंधित सगळ्यांसाठी हा एक महाकुंभ भरल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हे कृषी प्रदर्शन शुक्रवार दिनांक 11 मार्च ते सोमवार 14 मार्च 2022 पर्यंत सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रदर्शनात येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
VIDEO