जळगाव, दि.१० – जामनेर तालुक्यातील वाकोद ग्रुप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने गावातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनेचे काम मार्गीलावण्याच्या मागणीसाठी जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी लोकप्रतिनिधींविरोधात ग्रामस्थांनी जोरदार घोषणा देण्यात आल्या. राजकीय पुढाऱ्यांचे हेवेदावे आणि उदासीनतेमुळे पाणीपुरवठा योजना प्रलंबित असल्याची तक्रार करत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.
गावात राष्ट्रीय पेयजल योजनेस मान्यता देण्यात आली आहे. मात्र योजना वेळेत पूर्ण न झाल्याने भीषण पाणी टंचाई परिस्थिती उद्भवणार असल्याचे बोलले जातेयं. येत्या आठवड्यात जर पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी न निघाल्यास गृप ग्रामपंचायत वाकोद तसेच गावातील महिला व ग्रामस्थांकडून जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.
VIDEO