संदीप ओली | चोपडा, दि. ०४ – तालुक्यातील वाळकी घोडगाव शिवारात एका शेतकऱ्याने तब्बल तीन एकर परिसरात अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आलायं. प्रशांत पाटील यांच्या मालकीच्या शेतात तब्बल तीन एकर परिसरात अफूच्या झांडाची लागवड करण्यात आली असल्याची गोपनिय माहिती पोलिस निरिक्षक देविदास कुनगर यांना मिळाली होती, त्यानुसार संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. या अफूची किंमत अंदाजे करोडो रूपये असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आलायं.
पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यात आता पर्यंत करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे देखील सांगण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकचं खळबळ उडाली. दरम्यान घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी भेट दिली
पोलिस विभागाच्या कारवाईमुळे अफू लागवड करणाऱ्यांचे धाबे दणादणले असून अशाप्रकारची लागवड अन्य कुठे करण्यात आली आहे का ? याचा देखील तपास पेलीस घेत आहेत.
VIDEO