अमळनेर, दि.२७ – तालुक्यातील श्री क्षेत्र पाडळसरे येथे तापी, बोरी व अनेर नदीच्या त्रिवेणी संगमावर असलेल्या पुरातन व जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र नाटेश्वर महादेव यात्रोत्सव सुरू आहे.
यात्रोत्सवानिमित्त महिला व आबालवृद्धांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती, अभिषेक व पूजन करून नवसपूर्तीसाठी या ठिकाणी पंचक्रोशीतून भाविक येत असतात. महादेवाला दाळ बट्टीचा नैवेद्य दाखवून महाप्रसाद वाटप करण्यात येतो. दरम्यान सरपंच शुभांगी पाटील व उपसरपंच शिवाजी पाटील यांनी ट्रॅक्टरवर सजविण्यात आलेल्या तगतरावची श्रीफळ वाहून पूजन केले.
यावेळी सजवलेला तगतराव नाटेश्वर महादेव मंदिर परिसरात नेऊन देवासमोर हजेरीचा कार्यक्रम सादर केला. शिवलींगावर बेलपत्र व श्रीफळ वाहून गावकऱ्यांच्या सुख, समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच रात्री लोकनाट्य तमाशाचे सादरीकरण करण्यात आले. यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने परिश्रम घेतले.
VIDEO