• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘जय भवानी जय शिवाजी’ च्या जयघोषाने दणाणली गोदावरी नगरी

ढोल-ताशाच्या गजरात गोदावरी शैक्षणिक संस्थांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 19, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
‘जय भवानी जय शिवाजी’ च्या जयघोषाने दणाणली गोदावरी नगरी

जळगाव, दि.१९ – गगनभेदी नजर ज्याची, पहाडा समान विशाल काया, धगधगता सुर्य ही झुकतो आणि वंदितो शिवराया.. अशा या स्वराज्य निर्माण करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्‍त गोदावरी फाऊंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात ‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर करण्यात आला.

गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्‍त सकाळी ९ वाजता महाविद्यालय परिसरात मिरवणूक काढण्यात आली. यात जिजाऊ, शिवाजी महाराजांची व्यक्‍तीरेखा साकारण्यात आली. संपूर्ण महाविद्यालय परिसर हा भगव्यांमुळे शिवमय होऊन गेला. पारंपरिक पेहरावात मुली तर मुलांनी देखील मावळ्यांची वेशभुषा साकारत उत्सवात सहभाग नोंदविला.

यात लेझीम पथकाद्वारेही सादरीकरण करण्यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन महाराजांचा जय जयकार करण्यात आला. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील, डी एम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्या डॉ.मौसमी लेंढे, उपप्राचार्य मेनका एस पी, नर्सिंगचे संचालक शिवानंद बिरादर, रजिस्ट्रार प्रविण कोल्हे, मेट्रन संकेत पाटील यांच्यासह नर्सिंगचा संपूर्ण स्टाफ उपस्थीत होता.

यावेळी विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करत हर हर महादेव अशा घोषणा देत महाविद्यालय परिसर दणाणून टाकला. डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातही शिवजयंतीनिमत्‍त पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, रजिस्ट्रार राहुल गिरी यांच्यासह स्टाफची उपस्थीती होती. विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला तसेच शिवरायांचा जय जयकारही करण्यात आला. मिरवणूकीत विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित हातात भगवे झेंडे घेत जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करुन संपूर्ण गोदावरी नगरीत जल्‍लोष केला.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातही शिवजयंती निमित्‍त भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्याहस्ते छत्रपती शिवरायांची महाआरती करण्यात आली. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एच.पाटील, उपप्राचार्य प्रविण फालक, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, गोदावरी आयएमआर महाविद्यालयाचे संचालक डॉ.प्रशांत वारके, प्रा.हेमंत इंगळे, प्रा.ईश्‍वर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते.

शैक्षणिक संस्थांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी..
गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सावदा आणि भुसावळ, डॉ.उल्हास पाटील कृषी, कृषी अभियांत्रिकी, कृषी अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी, डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील संगीत महाविद्यालय, फॅशन टेक्नॉलॉजी, हरीभाऊ जावळे हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय याठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, सर्व स्टाफ, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केले, यावेळी रॅली, मिरवणूक, नाटिका सादर करुन शिवरायांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.


Tags: डाॅ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय
Next Post
रोटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून शिवकालीन शिवजयंती साजरी

रोटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून शिवकालीन शिवजयंती साजरी

ताज्या बातम्या

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप
खान्देश

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप

October 18, 2025
सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
खान्देश

सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 18, 2025
सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!
खान्देश

सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!

October 17, 2025
बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group