• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चोरगाव शिवारात बिबट्याची दहशत

जि.प. सदस्य प्रताप पाटील यांच्या प्रयत्नातून वन विभागाने लावला पिंजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 15, 2022
in जळगाव जिल्हा
0
चोरगाव शिवारात बिबट्याची दहशत

धरणगाव, दि. १५ – तालुक्यातील चोरगाव शिवारात बिबट्याने गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला आहे. सध्या या परिसरामध्ये शेतीची कामे सुरू असल्याने शेतात काम केल्याशिवाय मजुरांना पर्याय नाही. परंतु शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

सोमवारी चोरगाव येथे मंगल विठ्ठल सोनवणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासराचा फडशा बिबट्याने पाडला. यापूर्वी २७ जानेवारीला देखील दोन वासरे बिबट्याने फस्त केली होती. आव्हाणी येथे आठ दिवसांपूर्वी गुरांवर हल्ला केला होता. सतत घडत असलेल्या घटनांमुळे नदीकाठावरील चोरगाव, नंदगाव, देवगाव, फुकणी, नारणे, आव्हाणी, दोनगाव येथील ग्रामस्थ, शेतकरी भयभीत झालेले आहे. शेतकरी रात्री पिकांना पाणी द्यायला जाण्यासाठी जीव मुठीत धरून जात आहेत.

दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे यासाठी जि.प. सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार आज चोरगाव ते देवगाव-फुकणी रस्त्यावर पिंजरा लावण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई, चोरगाव सरपंच ज्ञानेश्वर सोनवणे, जंगु बापू सोनवणे, काशीनाथ सोनवणे, अनिल पवार, मच्छिद्र सोनवणे, मस्तान शाह आदी उपस्थित होते.

चोरगाव, देवगाव, फुकणी, नंदगाव, नारणे, आव्हाणी, दोनगाव परिसरात असलेला बिबट्याचा वावरामुळे माणसांना धोका होण्याची शक्यता असल्याने, वन अधिकाऱ्यांना सांगून बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असून लवकरात लवकर बिबट्या पकडला जाईल अशी आशा जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी व्यक्त केली.


 

Tags: धरणगावप्रताप पाटील
Next Post
राष्ट्रीय समाज पक्ष जिल्ह्यात आगामी निवडणुका स्वबळावर लढणार.. – प्रा.विठ्ठल शिंगाडे, जिल्हा प्रभारी  VIDEO

राष्ट्रीय समाज पक्ष जिल्ह्यात आगामी निवडणुका स्वबळावर लढणार.. - प्रा.विठ्ठल शिंगाडे, जिल्हा प्रभारी VIDEO

ताज्या बातम्या

परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
गुन्हे

परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

October 6, 2026
गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन
जळगाव जिल्हा

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 6, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक

October 6, 2026
उघड्या गटारीने घेतला तरुणाचा बळी; मेहरुणमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
गुन्हे

उघड्या गटारीने घेतला तरुणाचा बळी; मेहरुणमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

October 6, 2026
जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्हे व राज्याबाहेर चारा वाहतूक, विक्रीस सक्त मनाई
कृषी

जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्हे व राज्याबाहेर चारा वाहतूक, विक्रीस सक्त मनाई

October 6, 2026
प्रा. वसंत हंकारे यांचे १३ ऑक्टोबरला जामनेरात व्याख्यान; साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचा पुढाकार
जळगाव जिल्हा

प्रा. वसंत हंकारे यांचे १३ ऑक्टोबरला जामनेरात व्याख्यान; साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचा पुढाकार

October 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add