• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ग्रामपंचायत व लोकसहभागामुळे गावाचा सर्वांगीण विकास.. – पेरे पाटील

१०० सौर ऊर्जेच्या पथदिव्यांचे लोकार्पण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 7, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
ग्रामपंचायत व लोकसहभागामुळे गावाचा सर्वांगीण विकास.. – पेरे पाटील

धरणगाव, दि.०७ – सरपंच व ग्रामसेवक यांच्यातील समन्वय व त्यांना लोकसहभागाची साथ मिळाल्यास खऱ्या अर्थाने गावाचा सर्वांगीण विकास साधला जातो. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी हा महत्त्वाचा घटक असून त्यासाठी जनतेने नियमित कर भरणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच पेरे पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील अनोरे येथे केले. तर विकासासाठी ध्येय व नियोजन महत्वाचे असून अनोरे गाव आदर्श करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. १०० सौर ऊर्जेच्या पथदिव्यांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बटण दाबून १०० सौर ऊर्जेच्या पथ दिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी जल्लोष केला. जिल्ह्यात प्रथमच एकाच वेळेला सौर उर्जेवरील १०० पथ दिव्यांचे लोकार्पण करण्यात आले असल्याचे बोलले जात होते.

यावेळी पेरे पाटील म्हणाले की, गावकऱ्यांनी काम करणाऱ्या सरपंच व पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून त्यांना भक्कम साथ देण्याची गरज आहे. तर गुलाबराव पाटील हे शब्द पाळणारे मंत्री असून त्यांच्या नेतृत्व व दातृत्वाचा फायदा गावं विकासाठी करावा असे आवाहन या प्रसंगी त्यांनी केले.

विकासासाठी ध्येय व नियोजन महत्वाचे – ना. गुलाबराव पाटील
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अनोरे येथील अभिनव उपक्रमाची स्तुती केली. विदेशवारी केलेले तरुण सरपंच स्वप्नील महाजन यांच्या कार्याचा देखील कौतुक करून अस्तित्व फाउंडेशनचे आभार मानून तोंड भरुन कौतुक केले. जिल्ह्यात गाव आदर्श करण्यासाठी अस्तित्व फाउंडेशन सारख्या संस्थांनी व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन लोकसहभाग देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री पाटील यांनी केले. गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसून अनोरे गाव आदर्श करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

अस्तित्व फाउंडेशनचा असाही पुढाकार !
गावाला स्वप्निल महाजन यांच्या रूपाने उच्चशिक्षित व तरुण सरपंच लाभल्यामुळे गावात लोकसहभागाद्वारे विकास कामे व्हावी, यासाठी अस्तित्व फाउंडेशनचे चेअरमन मिलींद पाटील व त्यांच्या सर्व सहकारी सदस्यांनी अनोरे गावासाठी सौर ऊर्जेवर चालणारे १०० पथदिवे दिल्याने गाव विकासासाठी पुढाकार घेतल्याबद्दल चेअरमन मिलिंद पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांचे मान्यवरांनी तोंडभरून कौतुक केले.

याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, अस्तित्व फाऊंडेशनचे चेअरमन मिलिंद पाटील, काँग्रेसचे डी.जे. पाटील, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भाजपाचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, जि.प. सदस्य गोपाल चौधरी, पं.स.चे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, सरपंच स्वप्नील महाजन, उपसरपंच रूपाली पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनीषा महाजन, मंगला गायकवाड, कल्पना कापडणे, तुकाराम गायकवाड, अधिकार पाटील, जिजाबाई पाटील, धानोराचे सरपंच भगवान महाजन, ग्रामसेवक अनिल पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 


Tags: गुलाबराव पाटीलधरणगावपेरे पाटीलसौर उर्जा
Next Post
निष्पक्ष व निर्भीड सच्चा पत्रकार म्हणजे प्रा.हिरालाल पाटील सर होय..

निष्पक्ष व निर्भीड सच्चा पत्रकार म्हणजे प्रा.हिरालाल पाटील सर होय..

ताज्या बातम्या

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!
खान्देश

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!

October 25, 2025
जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले

October 25, 2025
पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!
खान्देश

पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

October 25, 2025
बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड
खान्देश

बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड

October 24, 2025
“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध
खान्देश

“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध

October 23, 2025
आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत
खान्देश

आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत

October 23, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group