गजानन पाटील | अमळनेर, दि.०४ – तालुक्यातील शहापूर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून हा रस्ता गेली अनेक वर्षे उपेक्षित राहिला आहे. सद्यस्थितीत या रस्त्याचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुमारे ४० लक्ष रुपये निधीच डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान या कामाचे भूमिपूजन देखील मागील आठवड्यात जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सद्यस्थितीत रस्त्याचं काम सुरु असून आधीचा जुन्या रस्त्यावर डांबर न टाकताच खडीकरण केले जात असून रस्ता मजबूत कसा राहील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हा रस्ता जिल्हा परिषदेच्या निधीतुन दोन किलोमीटर मंजूर झाला असून रस्त्याचे काम निवेदेनुसार व गुणवत्ता पूर्वक व्हावे. यासाठी ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे मागणी केली आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.