• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘ग्लोबल हँडवॉशिंग-डे’ निमित्त हात धुण्याबाबत जनजागृती

गोदावरी आयएमआरच्या एनएसएस विभागातर्फे जनजागृती प्रात्यक्षिक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 19, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक, सामाजिक
0
‘ग्लोबल हँडवॉशिंग-डे’ निमित्त हात धुण्याबाबत जनजागृती

जळगाव, प्रतिनिधी : ‘ग्लोबल हँडवॉशिंग-डे’ अर्थात जागतिक हात धुणे दिनानिमित्त गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएमआर), जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे मण्यारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आरोग्य व स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच वैयक्तिक स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजविणे आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाला माजी सरपंच राजूदादा, ग्रामसेविका आणि शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ कोळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी एनएसएस स्वयंसेवकांनी शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले.

हात योग्य पद्धतीने कसे धुवावेत, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर तसेच हात अस्वच्छ झाल्यावर साबणाने हात धुणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. नियमित हात धुण्याच्या सवयीमुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

उपक्रम यशस्वीतेसाठी एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. स्मिता चौधरी, क्रीडा संचालक प्रा चंद्रकांत डोंगरे, एनएसएस सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा दीपक दांडगे आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


 

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात

ताज्या बातम्या

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती
खान्देश

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 19, 2026
मण्यारखेडा शाळेत गोदावरी आयएमआरतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती
खान्देश

मण्यारखेडा शाळेत गोदावरी आयएमआरतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 19, 2026
शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचे दिमाखात उद्घाटन
खान्देश

शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचे दिमाखात उद्घाटन

October 19, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात

October 19, 2026
‘ग्लोबल हँडवॉशिंग-डे’ निमित्त हात धुण्याबाबत जनजागृती
जळगाव जिल्हा

‘ग्लोबल हँडवॉशिंग-डे’ निमित्त हात धुण्याबाबत जनजागृती

October 19, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add