• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात

पारंपरिक वेशभूषा, गरबा-दांडियाची धूम; विद्यार्थ्यांनी सादर केले कलागुण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 19, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात

जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, गरबा-दांडियाचा ताल आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महाविद्यालय परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.

या उत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. बेस्ट कॉस्च्युम/आउटफिट स्पर्धा,बेस्ट कपल दांडिया स्पर्धा, तर ग्रुप गरबा स्पर्धा घेण्यात आली. यासोबतच गरबा किंग आणि गरबा क्वीन यांचीही निवड करण्यात आली.नवरात्रोत्सवाच्या अंतिम दिवशी गोदावरी फाउंडेशनचे सदस्य आणि प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या स्पर्धांमध्ये बेस्ट कॉस्च्युम/आउटफिट पुरस्कार सानिका कारंडे आणि रोहित पाटील यांनी पटकावला. बेस्ट कपल म्हणून अनुष्का बर्‍हाटे आणि सुमित थिगळे यांची निवड झाली, तर ग्रुप गरबा स्पर्धेत एल.वाय. ग्रुपने बाजी मारली. गरबा किंगचा मान वृषभ सुतार याला, तर गरबा क्वीनचा मान अश्विनी ठाकरे हिला मिळाला.

या नवरात्रोत्सवाचे समन्वयन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. नकुल गाडगे यांनी केले, तर सूत्रसंचालन विद्यार्थिनी देवयानी पाटील हिने केले. यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजक व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


 

Next Post
शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचे दिमाखात उद्घाटन

शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचे दिमाखात उद्घाटन

ताज्या बातम्या

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती
खान्देश

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 19, 2026
मण्यारखेडा शाळेत गोदावरी आयएमआरतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती
खान्देश

मण्यारखेडा शाळेत गोदावरी आयएमआरतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 19, 2026
शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचे दिमाखात उद्घाटन
खान्देश

शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचे दिमाखात उद्घाटन

October 19, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात

October 19, 2026
‘ग्लोबल हँडवॉशिंग-डे’ निमित्त हात धुण्याबाबत जनजागृती
जळगाव जिल्हा

‘ग्लोबल हँडवॉशिंग-डे’ निमित्त हात धुण्याबाबत जनजागृती

October 19, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add