जळगाव, दि. 25 – जळगावचं सांस्कृतिक विश्व विस्तारण्याचे कार्य गेल्या ११ वर्षापासून संजिवनी फाऊंडेशन संचलित ‘परिवर्तन’ संस्था निष्ठेने करत आहे. सातत्याने सर्जनशील कार्यक्रमांची निर्मिती हे परिवर्तनचे वैशिष्ट्ये असल्याचे मत परिवर्तनच्या मंचावरून मान्यवरांनी व्यक्त केले.
वर्धापनदिनानिमित्त विद्या रंगमंचावर आयोजित “सिहांवलोकन” कार्यक्रमात परिवर्तनचे मार्गदर्शक जेष्ठ रंगकर्मी व पत्रकार विजय बाविस्कर यांनी “परिवर्तनने महाराष्ट्रभरात एक उत्तम प्रयोगशील संस्था म्हणून नाव प्राप्त केले आहे याचा जळगावकर म्हणून मला अभिमान वाटतो.” कार्यक्रमात शंभू पाटील यांना नाशिक येथील प्रतिष्ठेचा “गिरणा गौरव पुरस्कार” जाहीर झाल्याबद्दल विजय बाविस्कर, अनिल शहा, श. दि. वडोदकर, अनिल कांकरिया, अमर कुकरेजा, शिरिष बर्वे, छबिराज राणे, विजय पाठक, सुदिप्ता सरकार, डॉ रेखा महाजन, मंजुषा भिडे, नारायण बाविस्कर या मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला.
शंभू पाटील यांनी कृतज्ञतापूर्वक हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या परिवर्तनचा असल्याचे सांगितले. मानपत्राचे वाचन कार्याध्यक्ष नारायण बाविस्कर यांनी केले. गेल्या ११ वर्षातील कार्याचा आढावा घेणारा “सिंहावलोकन” कार्यक्रमात परिवर्तनच्या नाट्य, साहित्य, संगीत, चित्रकला, महोत्सव, पुरुषोत्तम करंडक अशा विविध प्रकारच्या उपक्रमांचे अवलोकन करत सहभागी कलावंतांनी मांडणी केली.
यात प्रा सत्यजित साळवे, डॉ अनिल डोंगरे, मनोज पाटील, विनोद पाटील, वसंत गायकवाड, किशोर पवारपवार, अंजली पाटील, जयश्री पाटील, प्रतिक्षा कल्पराज, मोना निंबाळकर, हर्षदा कोल्हटकर , मनिष गुरव, योगेश पाटील विजय जैन, राजू बाविस्कर, नितीन सोनवणे, यशवंत गरूड, अक्षय नेहे, मिलिंद जंगम, हर्षदा पाटील, साक्षी पाटील, जागृती भिडे, बुद्धभुषण मोरे, उर्जा सपकाळे , अभिजीत पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन हर्षल पाटील यांनी केले.