जळगाव, दि. 23 – भारतीय संस्कृती व संविधानाला अनुसरून हवा असलेला समाज निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता, शांती व बंधुभाव अबाधित रहावा यासाठी सै.नियाज अली भैय्या फाऊंडेशनच्या वतीने सर्व धर्मीय धर्मगुरूंना एका व्यासपीठावर आणून पैगाम ए अमन (शांतीचा संदेश) या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी जळगावात करण्यात आले. दरम्यान शांतीचे प्रतीक असलेले पांढरे कबूतर सर्वधर्मीय धर्मगुरूं यांच्या हस्ते आकाशात उडवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सै.अयाज अली यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शन भवानी मंदिरचे पंडित महेश कुमार त्रीपाठी, सुन्नी जामा मशिदीचे मौलाना जाबीर रजा अमजदी, गुरुद्वारा गुरुसिंग सभाचे ग्यानी गुरुप्रीत सिंग, सेंट अलायन्स चर्चचे फादर सुमसिंग आर्य, भन्ते संघनायक यन सुगंत वंतजी महाथेरो, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे दीपक जोशी, मौलाना नौशाद साबरी, अस्सलाम बाबा अशरफी यांनी मानवता, शांती, बंधुभाव व देशभक्ती याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. धर्मग्रंथातील श्लोक म्हणत त्याचे अनुवाद करून लोकांना मंत्रमुग्ध केले.
सदर कार्यक्रम हा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा झाला असून आज पासून तर 26 जानेवारी पर्यंत सतत सुरू राहणार आहे. या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी कार्यकर्ते अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी सै.नियाज अली भैय्या फॉउंडेशनचे सै.अयाज अली नियाज अली, डॉ.परिमल मुझुमदार, नारायण वाणी, योगेश मराठे, मनोज कपश्प, सुरज गुप्ता, मुकेश परदेशी, शेख शफी, हाजी सलीम उद्दीन, बन्सी सामंथा, नंदकुमार वाणी, नितीन शिंपी, शेख नजीर उद्दीन, जावेद बागवान, यांसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.