• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

चार प्रयत्नांनंतर यश; ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात विद्यार्थिनींचा जल्लोष

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 5, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

जळगाव, प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल पाच थरांचा मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडली. हंडी फोडण्यासाठी चार वेळा प्रयत्न करण्यात आले. अखेर पाचव्या थरावर यशस्वी चढाई करत विद्यार्थिनींनी दहीहंडी फोडताच परिसरात जल्लोष झाला.

कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डी एम कॉर्डीओलॉजीस्ट तथा सदस्य गोदावरी फॉउंडेशन डॉ. वैभव पाटील, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या विशाखा गणविर, उपप्राचार्य जेसिंथ ढाया, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके, डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादार, वैद्यकिय अधिक्षक डॉ प्रेमचंद पंडीत, कार्यकारी अधिकारी डॉ. विजय बाविस्कर, परिचारीका अधिक्षक संकेत पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक विशाखा वाघ यांनी केले.

दहीहंडीच्या उत्सवात विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभाग घेतला. गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व भगवान गोपाळ कृष्णाचे पूजन व झूला करण्यात आला. ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात विद्यार्थिनींच्या पथकांनी मानवी मनोरा रचण्यास सुरुवात केली. पहिल्या काही प्रयत्नांत हंडी फोडण्यात यश आले नाही. मात्र, विद्यार्थिनींनी हार न मानता पुन्हा जोमाने प्रयत्न केले. चार प्रयत्नांनंतर पाच थरांचा मजबूत मानवी मनोरा उभारण्यात आला आणि अखेर दहीहंडी फोडण्यात विद्यार्थिनींना यश आले. हंडी फुटताच विद्यार्थिनींनी जल्लोष करत आनंद साजरा केला.

यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या अधिरम बॅचने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार यांनी मानले यशस्वीतेसाठी गोदावरी व डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये एकजूट, संघभावना, आत्मविश्वास, शिस्त आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ झाली.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या उत्साहाचे कौतुक केले. पारंपरिक सण-उत्सवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख होण्यासोबतच संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते, असे उपस्थितांनी नमूद केले. उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडलेल्या या दहीहंडी सोहळ्यामुळे गोदावरी व डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचा परिसर कृष्णमय झाला होता.मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले.


 

ताज्या बातम्या

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
खान्देश

जि.प.च्या १५ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

September 4, 2026
त्रिवेणी समूहातर्फे ‘श्रावण सरी’चे आयोजन; विशेष सन्मानांसह कलागुण, खेळांचे होणार सादरीकरण
जळगाव जिल्हा

त्रिवेणी समूहातर्फे ‘श्रावण सरी’चे आयोजन; विशेष सन्मानांसह कलागुण, खेळांचे होणार सादरीकरण

September 4, 2026
भुसावळात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक
गुन्हे

भुसावळात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

September 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add