• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जि.प.च्या १५ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

विभागीय आयुक्तांची मान्यता; १५ तालुक्यांतून निवड, पुरस्कारार्थींमध्ये सहा महिला शिक्षकांचा समावेश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 4, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा, शैक्षणिक, सामाजिक
0
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार

जळगाव : जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना सन २०२४-२५ या वर्षासाठीचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांनी पुरस्कारार्थी शिक्षकांच्या यादीला अधिकृत मान्यता दिली आहे. यंदाच्या पुरस्कारार्थींमध्ये सहा महिला शिक्षकांचा समावेश असल्याने हे विशेष ठरले आहे.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी शहरातील ला. ना. सार्वजनिक विद्यालयाच्या गंधे हॉलमध्ये पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार, शिक्षक आमदार आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून प्रत्येकी एका शिक्षकाची ‘आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांमध्ये अमळनेर तालुक्यातील आटाळे येथील योगेश्वर भाऊराव पाटील, भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील विलास सुकदेव माळी, बोदवड तालुक्यातील येवती येथील ईश्वर जीवन मंडावरे, भुसावळ तालुक्यातील महादेव माळ येथील निलेश माणिकराव पाटील, चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील प्रभावती सर्जेराव पाटील, चोपडा तालुक्यातील कुरवेल-तावसे बु. येथील हरी नामदेव बाविस्कर, धरणगाव तालुक्यातील पाळधी बु. येथील मनीषा शैलेश शिरसाठ, एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील सोनाली प्रफुल्ल बोरसे, जळगाव तालुक्यातील भोकर येथील मनीषा गोविंदा मारकड, जामनेर तालुक्यातील रांजणी येथील जुगलकिशोर गोविंदलाल ठाकरे, मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव पुनर्वसन येथील नीता राजीव काकर, पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील संजू भावसिंग राठोड, पारोळा तालुक्यातील कराडी येथील स्मिता श्रीराम देसले, रावेर तालुक्यातील कुसुंबे येथील दीपक आनंदा कोल्हे आणि यावल तालुक्यातील हिंगोणे येथील गिरीष रामचंद्र महाजन यांचा समावेश आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी पुरस्काराच्या मान्यतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी पुरस्कारार्थी शिक्षकांच्या यादीला अधिकृत मान्यता दिली. पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

गुणवंत शिक्षकांच्या कार्याची दखल घेत त्यांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्काराने’ गौरव होत असल्याने शिक्षण क्षेत्रातून पुरस्कारप्राप्त शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास शिक्षक, शिक्षणप्रेमी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर आणि शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी केले आहे.


 

ताज्या बातम्या

शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
खान्देश

जि.प.च्या १५ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

September 4, 2026
त्रिवेणी समूहातर्फे ‘श्रावण सरी’चे आयोजन; विशेष सन्मानांसह कलागुण, खेळांचे होणार सादरीकरण
जळगाव जिल्हा

त्रिवेणी समूहातर्फे ‘श्रावण सरी’चे आयोजन; विशेष सन्मानांसह कलागुण, खेळांचे होणार सादरीकरण

September 4, 2026
भुसावळात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक
गुन्हे

भुसावळात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

September 3, 2026
जळगावात युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद! १५ संघांना दहीहंडी फोडण्याची समान संधी
Uncategorized

जळगावात युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद! १५ संघांना दहीहंडी फोडण्याची समान संधी

September 3, 2026
स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
जळगाव जिल्हा

स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

September 3, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा
जळगाव जिल्हा

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

September 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add