• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शानबाग विद्यालयात लोककला प्रशिक्षण शिबिर उत्साहात; ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 3, 2026
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
शानबाग विद्यालयात लोककला प्रशिक्षण शिबिर उत्साहात; ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

​जळगाव, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या समृद्ध पारंपरिक लोककलेची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि लोप पावत चाललेल्या लोककलांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या वतीने येथील शानबाग निवासी विद्यालय येथे पारंपरिक लोककला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.

​कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांनी बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष व मध्यवर्तीचे प्रभारी प्रमुख कार्यवाहक योगेश शुक्ल तसेच परिषदेचे प्रमुख कार्यवाहक व लोककलेचे अभ्यासक शाहीर विनोद ढगे यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात शिबिराचे समन्वयक शाहीर विनोद ढगे यांनी, “महाराष्ट्राची लोककला हा सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जीवनाचा अमूल्य ठेवा असून आधुनिकतेच्या प्रवाहात या कलांचे संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांची प्रत्यक्ष ओळख करून देणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले.

​शिबिरादरम्यान शाहीर विनोद ढगे यांनी विद्यार्थ्यांना शाहिरी परंपरा आणि पोवाड्याचे स्वरूप समजावून सांगत पोवाडा व भारुडाचे प्रभावी सादरीकरण केले. भारुडाच्या सादरीकरणात बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन, सदस्य मोहित पाटील आणि अवधूत दलाल यांनी सहभाग घेत सामाजिक प्रबोधन घडवून आणले. तसेच, शिवकालीन ‘करपावली’ या दुर्मीळ लोककलेचे ज्येष्ठ कलावंत अरुण जोगी, अशोक जोगी व बबन जोगी यांनी, तर ‘गोंधळ’ या कलाप्रकाराचे अवधूत दलाल व गजानन साळुंखे यांनी प्रात्यक्षिकासह सादरीकरण केले. या वेळी लोककलांचे सादरीकरण करण्यासोबतच त्यांचा इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

​बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेच्या अध्यक्ष नीलम शिर्के-सावंत यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हयातील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत लोककला पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जळगावसह अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ येथेही अशा शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.

​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी दर्शन गुजराती, मोहित पाटील, सचिन महाजन, अवधूत दलाल आणि शानबाग विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शिबिराच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

ताज्या बातम्या

शानबाग विद्यालयात लोककला प्रशिक्षण शिबिर उत्साहात; ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

शानबाग विद्यालयात लोककला प्रशिक्षण शिबिर उत्साहात; ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

September 3, 2026
गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर
Uncategorized

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

September 3, 2026
कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add