• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्यस्तरीय बैठकीत जिल्हा वार्षीक सर्वसाधारण योजनेसाठी ४२५ कोटींची तरतूद !

नाविन्यपूर्ण योजनेच्या कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 21, 2022
in जळगाव जिल्हा, राज्य
0
राज्यस्तरीय बैठकीत जिल्हा वार्षीक सर्वसाधारण योजनेसाठी ४२५ कोटींची तरतूद !

जळगाव दि. २१ (जिमाका) – जिल्हा वार्षीक योजना सर्वसाधारण २२-२३ करीता ३५७ कोटी ४९ लक्ष रूपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपूराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त ६७ कोटी ५० लक्ष रूपयांचा निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी ४२५ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, या संदर्भात आज ऑनलाईन पद्धतीने झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे कौतुक केले.

जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय आढावा बैठक दूरदृश्य प्रणाली द्वारे मुंबई सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आज पार पडली. या बैठकीस जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, वित्त व नियोजन विभागाचे अपर सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, आ. शिरीष चौधरी, आ.चंद्रकांत पाटील, आ.अनिल पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, अधिष्ठाता रामानंद, सा.बा.चे अधिक्षक अभियंता सौ. गिरासे, सिव्हील सर्जन नागोजीराव चव्हाण, यांच्यासह विविध यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेसाठी (सर्वसधारण) सन २०२२ -२०२३ करीता ३५७ कोटी ५० लक्ष रुपयांचा नियतव्यय मर्यादा ठरवून दिलेली होती. मात्र, कार्यान्वयीन यंत्रणांनी ९८५ कोटी ८८ लक्ष रुपयांची मागणी केलेली आहे. त्यानुसार किमान १०० कोटी रुपयांची जादाची मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत केली. त्यानुसार जिल्ह्याची कामांची निकड लक्षात घेता उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी ६८ कोटी निधीची वाढ केल्याने या निधीतून आरोग्य केंद्रांची बांधकामे, पाटबंधारे विभागाच्या योजना, रस्ते विकास, स्मशानभूमी कामे, ग्रामपंचायत कार्यालये, शाळा वालकंपाऊंड, क्रीडा, अंगणवाडी बांधकाम व जिल्ह्यातील आरोग्य बळकटीकरणासाठी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले .

नाविन्यपूर्ण मधिल कामांचे तसेच कार्यकारी समितीचे सदस्य व विशेष निमंत्रितांच्या नेमणुका याबाबत उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक !
जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शाळा वॉल कंपाऊंड, शेत पाणंद रस्ते तसेच आरोग्याच्या बळकटी करणासाठी केलेल्या कामांचे तसेच कार्यकारी समितीचे सदस्य व विशेष निमंत्रितांच्या नेमणुका याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे व नियोजन विभागाचेही कौतुक केले. जिल्ह्यात १००% लसीकरणावर भर देवून बुस्टर डोस देण्याचे तातडीने नियोजन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. महसूल मधील प्रांत व तहसीलदार यांच्या वाहनांसाठी खर्च करण्याबाबत विचार करावा . या वर्षाचा १०० % निधी खर्च करण्याबाबत दक्षता घेण्यात यावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.


Next Post
प्राजक्ता मृत्यू प्रकरणी संतप्त नातेवाईकांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन VIDEO

प्राजक्ता मृत्यू प्रकरणी संतप्त नातेवाईकांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन VIDEO

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group